Marathi christian worship songs
मी पत्थर तू शिल्पकार , हवा तुला रे तसा प्रभू मज
दे दे तू आकार आ sss आ sss ||धृ||
मन ओंजळ मी पापी पामर, पतिताचा तू एकच प्रियकर,
आलो बांधुनी पापे पदरी, करू नको तू नाकार ---||१||
कोसळले मन मंदिर माझे, उभाराया तू येई विराजे
उजाडली रे जीवन नगरी, करशील तू साकार ---||२||
स्तवितो नित्तदिन क्षण सुखाचे, विस्मरलो सुख परमार्थाचे
पाय ढले हा तोल सुटला, दे मज तू आकार ---||३||
Marathi christian worship songs
आली वाणी आकाशातून , अवचित कानावरी sss
शौला sss का sss छळ माझा करी--(२) ||धृ||
जाता असता शौल दिमिष्का , बघता झाला प्रकाश चमकला
पडला भूमी मिटली नयेने , स्मृती ऐके वरी sss शौला sss ||१||
शौल विचारी त्यानाराजी , कोण असे तू सांग प्रभुजी
ज्या येशूचा छळ करशी तू , तोच मी नासोरी sss शौला sss ||२||
उठ आता जा नगरात , करावयाचे कथित तेथे
निवडलेले पात्र तू मम , आहेस या भुवरी sss
शौला का छळ माझा करी sss ||३||