The story of Genesis in Marathi
हे जग परमेश्वराचे आहे
प्रारंभ
खूप खूप वर्षापूर्वी देवाशिवाय काहीही अस्तित्वात नव्हते. लोक नव्हते, जग नव्हते, काळ नव्हता, अगदी काहीच नव्हते! यावर विश्वास ठेवणे तुम्हांला कठीण वाटते ना? परंतु बायबलमधील गोष्टीला येथूनच सुरवात होते.
बायबलमधील पहिल्या पुस्तकाचे नाव "उत्पति." हे सुरवातीच घडून गेलेल्या गोष्टींचे पुस्तक आहे... यामध्ये सर्व गोष्टींना देवापासून सुरवात झाली असे सांगितले आहे. आपोआप काहीही झाले नाही, तर देवानेच सर्वकाही निर्माण केले. पृथ्वी, लोक, ग्रह आणि विश्वसुध्दा! देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होती.
सर्व पुरुष आणि स्त्रिया, मुले आणि मुली, पशुपक्षी, झाडेझुडपे यांनी एकमेकांशी शांतीने आणि ऐक्याने राहावे अशी देवाची इच्छा होती.परंतु काहीतरी भयानक गोष्ट घडली आणि असे वाटले कि, सर्वकाही नष्ट होऊन देवाच्या महान योजनेचा अंत होतो कि काय!
परंतु तसे घडले नाही. देवाजवळ या समस्येसाठी आश्चर्यकारक उत्तर होते.
हे पुस्तक वाचतांना देवाने हि समस्या कशी सोडवली हे तुम्हांला समजेल. आपले जीवन उत्तम रीतीने,आनंदात जगावे अशी देवाची इच्छा आहे, हि गोष्ट हे पुस्तक वाचतांना तुमच्या लक्षात येईल.