Cain and abel story in marathi

 

               Cain and abel story in marathi



 पहिले भांडण  ( उत्पति 4:2-7 )

          जे लोक देवाची आज्ञा पाळीत नाहीत त्यांचे काय होते ते या गोष्टीतून आपल्याला समजते. काईन आणि हाबेल  हि आदाम आणि हव्वा यांची मुले होती.

Cain and abel story in marathi

cain and abel story

Kain and habel story in marathi


            हाबेल हा धनगर होता. काईन हा शेतकरी होता. एके दिवशी काईन याने आपल्या शेतातून धान्य आणून प्रभूला अर्पण केले. हाबेलाने त्याच्या एका  मेंढीला झालेले पहिलेच कोकरू देवाला अर्पण करण्यासाठी आणले. त्याने ते कोकरू मारले व त्याच्या मांसाचे उत्तम भाग प्रभूला दिले. प्रभू हाबेलावर संतुष्ट झाला व हाबेलाचे अर्पण त्याला आवडले. परंतु काईन व त्याचे अर्पण त्याला आवडले नाही.


Cain and abel story in marathi

cain and abel story

Kain and habel story in marathi


 काईन अतिशय संतापला. तेव्हा प्रभू काइनाला म्हणाला, "तु इतका रागावलेला का दिसतोस? तु मला योग्य अर्पण दिले नाहीस म्हणून तु दु:खी आहेस. पाप तुला पकडण्यास टपले आहे. पापला तुझा ताबा घ्यायचा आहे, पण तु पापावर ताबा मिळवला पाहिजे."



       पहिला खून  (उत्पति 4:8-16 )

 एक दिवस काईन आपला भाऊ हाबेल याला म्हणाला, "चल, आपण शेतात जाऊ या." तेथे गेल्यावर काइनाने  आपला भाऊ हाबेल याला ठार केले.

      तेव्हा प्रभुने काइनाला विचारले, "तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?" काइनाने उत्तर दिले, "मला माहित नाही. माझ्या भावाचा मी काय राखणदार आहे?"


Cain and abel story in marathi

cain and abel story

Kain and habel story in marathi


 तेव्हा प्रभूने म्हटले,  "हे  दुष्ट कृत्य तु का केलेस? तुझ्या भावाला ठार करण्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. तु आता एका शापाखाली आहेस. तुला आता काहीच पिकवता येणार नाही. तु तुझ्या भावाचा  खून केलास म्हणून जमीन तुझ्यासाठी काहीही पिकवणार नाही. तुला कोठेही निवारा मिळणार नाही."  

   काईन प्रभूला म्हणाला, हि माझ्यासाठी फारच कठोर शिक्षा आहे. तु मला तुझ्यापासून आणि माझ्या भूमीपासून दूर घालवीत आहेस.मला घर नाही.म्हणून ज्यांच्या मी नजरेत पडेन तो कोणीही मला ठार करू शकेल."                   परंतु प्रभू म्हणाला, "जो कोणी तुला मारील, त्याला मी शिक्षा करीन." काईनाला कोणी मारू नये आणि इतरांनी सावध राहावे यासाठी प्रभूने काइनाच्या शरीरावर एक चिन्ह केले.नंतर काईन प्रभूपासून दूर गेला.



Cain and abel story in marathi

cain and abel story

Kain and habel story in marathi

Cain and abel story in marathi

cain and abel story


 


Previous Post
Next Post
Related Posts