उत्पतीची कथा
प्रारंभी देवाने विश्व निर्माण केले. त्यावेळी पृथ्वीला आकार नव्हता. पृथ्वीवर सजीव असे काहीही नव्हते. सगळीकडे अंधार होता. उसळत्या पाण्याने सर्व व्यापून टाकले होते. त्या पाण्यावर देवाचे सामर्थ्य विहार करीत होते.तेव्हा देव म्हणाला, "प्रकाश होवो." आणि प्रकाश निर्माण झाला. ते पाहून देवाला आनंद झाला. मग त्याने अंधारापासून प्रकाशाला वेगळे केले. संध्याकाळ झाली, मग सकाळ झाली. हा पहिला दिवस होता.
मग देव बोलला, "आकाश निर्माण होवो" आणि आकाश निर्माण झाले. नंतर संध्याकाळ झाली आणि मग दिवस उजाडला. हा दुसरा दिवस
नंतर देव म्हणाला, "आकाशा खालचे सर्व पाणी एकवट होवो आणि जमीन दिसो" आणि तसे झाले. त्याने जमिनीला "पृथ्वी" आणि पाण्याला "समुद्र" असे नाव दिले. हे पाहून देवाला आनंद वाटला. मग देव बोलला, "पृथ्वीवर निरनिराळी वनस्पती, झाडेझुडपे वाढोत-काही धान्याची तर काही फळांची." आणि तसे झाले. यामुळे देवाला आनंद झाला. नंतर संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा तिसरा दिवस.
मग देव म्हणाला,"दिवसापासून रात्रीला वेगळ्या करणाऱ्या ज्योती आकाशात निर्माण होवोत. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी त्या आकाशात चमकतील. त्या दिवस, वर्षे, आणि ऋतूही दाखवतील." आणि तसे झाले. मग संध्याकाळ झाली व दिवस उगवला. हा चौथा दिवस होता.
मग देव बोलला, "पाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू होवोत. आकाशात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी निर्माण होवोत." आणि तसेच झाले. पाण्यातील मासे आणि इतर जीव, तसेच पक्षी या सर्वांना त्यांच्यासारखीच पिल्ले होती. सर्वांसाठी उत्तम तेच असावे अशी देवाची इच्छा होती. संध्याकाळ लोटली. नवीन सकाळ उगवली. हा पाचवा दिवस होता.
देवाने सर्व प्रकारचे प्राणी निर्माण केले आणि त्याला आनंद वाटला.
मग देव बोलला, "आता आपण मानव निर्माण करू. ते आपल्यासारखे असतील. त्यांना मासे आणि पक्षी यांवर अधिकार असेल. तसेच लहानमोठे सर्व पाळीव आणि जंगली प्राणी यांवर ते त्यांची सत्ता गाजवतील."
तेव्हा देवाने त्याच्यासारखे होण्यास मानवांना घडवले. त्याने त्यांना 'पुरुष आणि स्त्री' असे निर्माण केले. त्याने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, "तुम्हांला पुष्कळ मुलेबाळे होऊ द्या. त्यांनी पृथ्वीवर सर्व ठिकाणी वस्ती करावी आणि पृथ्वीवर सत्ता चालवावी. मी तुम्हांला मासे,पक्षी आणि सर्व पशु यांचा ताबा देतो. मी सर्व प्रकारची धान्ये आणि फळे तुम्हांला खायला दिली आहेत. सर्व पशु आणि पक्षी यांच्या अन्नासाठी गवत आणि झुडपे असतील." देवाच्या म्हणण्याप्रमाणे सर्व घडले. देवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी पाहिल्या आणि त्याला खूप समाधान वाटले. संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली. तो सहावा दिवस होता.
अशा प्रकारे संपूर्ण जगाची निर्मिती पूर्ण झाली. सातव्या दिवसापर्यंत सर्वकाही निर्माण करण्याचे काम देवाने संपवले. मग देवाने विश्रांती घेतली. त्याने सातवा दिवस खास विश्रांतीचा दिवस ठरवला.
Bible stories in Marathi
बायबल कथा marathi
Bible stories in Marathi
एदेन बाग
उत्पति 2:8,9, 15-17
नंतर प्रभूदेवाने एदेन येथे एक बाग तयार केली. तेथे त्याने निर्माण केलेल्या मानवाला ठेवले.त्याने सर्व प्रकारची सुंदर फळझाडे निर्माण केली. बागेच्या मध्यभागी दोन झाडे होती. एक, जीवन देणारे झाड आणि दुसरे,लोकांना बरेवाईट काय ते समजण्यास मदत करणारे झाड, मग एदेन बागेची देखभाल करण्यासाठी प्र्भूदेवाने मानवाला त्या बागेत ठेवले. त्याने त्याला सांगितले, "या बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तु खाऊ शकतोस, परंतु ज्या झाडामुळे तुला बरेवाईट समजू शकते, त्या झाडाचे फळ मात्र खाऊ नकोस. तु ते खाल्लेस तर नक्कीच मरशील.
पहिले मानव देवाची आज्ञा मोडतात
उत्पति 3:1-15, 20-23
हि कथा आदी मानव "आदाम" आणि स्त्री "हवा" यांची आहे. अनेकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नाचे उत्तर या कथेत सापडते. "देवाने सर्वकाही चांगले निर्माण केले, मग जगात वाईट गोष्टी का आहेत?" आदाम, हव्वा आणि आपण सर्व सुखी समाधानी असावे, अशी देवाची इच्छा होती. खरे सुख देवाचे आज्ञापालन केल्याने मिळते.
प्रभूदेवाने निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांमध्ये साप अतिशय कावेबाज होता. सापाने स्त्रीला विचारले, "बागेतील कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका, असे देवाने तुम्हांला खरेच सांगितले का?"
बायबल कथा marathi
बायबल कथा marathi
स्त्री म्हणाली, "आम्ही बागेतील कोणत्याही झाडाचे फळ खाऊ शकतो. पण बागेच्या मध्यावर असलेल्या झाडाचे फळ खाऊ शकत नाही. देवाने आम्हांला सांगितले कि,त्या झाडाचे फळ खाऊ नका व त्याला हातही लावू नका.जर तसे केले तर तुम्ही मराल." साफ म्हणाला, "हे खरे नाही. तुम्ही मरणार नाही. ते फळ खाल्ले, तर तुम्ही देवासारखे व्हाल. तुम्हांला चांगले आणि वाईट कळू लागेल, हे देवाला माहित आहे."
Bible stories in Marathi
स्त्रीला वाटले, "किती सुंदर आहे हे झाड! त्याचे फळ खाल्ले तर बरे होईल. ज्ञानी होणे हि गोष्ट किती अदभूत आहे." म्हणून तिने त्या झाडाचे फळ घेऊन ते थोडे खाल्ले व थोडे आपल्या पतीलाही दिले. त्यानेही ते खाल्ले आणि लगेच आपल्याला बरेवाईट समजू लागले याची जाणीव त्यांना झाली. ते नागवे आहेत हे त्यांना समजले. म्हणून त्यांनी अंजिराच्या झाडाची पाने शिवून स्वत:ला झाकून घेतले.
संध्याकाळी प्रभुदेव बागेत फिरत आहे हे त्यांनी ऐकले. त्याने पाहू नये म्हणून ते झाडांझुडपांमध्ये लपले. परंतु प्रभूदेवाने पुरुषाला हाक मारली, "आदामा" तु कोठे आहेस?'
आदाम म्हणाला, "तु बागेत फिरताना मी तुझा आवाज ऐकला. मला भीती वाटली, मी लपलो, कारण मी उघडा होतो." "तु उघडा आहेस हे तुला कोणी सांगितले? जे फळ खाऊ नको, असे मी तुला सांगितले ते फळ तु खाल्लेस काय?" देवाने विचारले.
उत्पतीची कथा /Bible stories in Marathi
बायबल कथा marathi
उत्पतीची कथा /Bible stories in Marathi
त्या पुरुषाने उत्तर दिले, :माझ्याबरोबर राहण्यासाठी तु दिलेल्या स्त्रीने ते मला दिले आणि मी ते खाल्ले." प्रभुदेवाने स्त्रीला विचारले, तु असे का केलेस? ती म्हणाली, "त्या साफाने मला त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले आणि मी ते फळ खाल्ले."
मग प्रभुदेव साफाला म्हणाला, "यासाठी तुला शिक्षा केली जाईल. सर्व प्राण्यांत तूच शापित ठरशील. येथून पुढे तु नेहमी तुझ्या पोटावर सरपटशील आणि तुला जन्मभर माती खावी लागेल. तु आणि स्त्री एकमेकांचा द्वेष कराल, असे मी करीन. तिची मुले आणि तुझी पिले हे सुध्दा एकमेकांचे शत्रू होतील. तिचे मुल तुझे डोके ठेचील. तु त्याच्या टाचेला चावशील." आदाम आणि हव्वा या दोघांनाही दु:ख वेदना सहन कराव्या लागतील, असा शाप देवाने दिला. आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण ती सर्व मानव प्राण्यांची माता होती. प्रभूदेवाने आदाम आणि हव्वा यांच्यासाठी प्राण्यांच्या कातड्याचे कपडे बनवून त्यांना घातले.
त्यानंतर प्रभूदेवाने म्हटले, "मनुष्य आता आपल्यापैकी एकासारखा बनला आहे. कारण त्याला चांगले व वाईट समजते. मात्र त्याला जीवन देणाऱ्या झाडाचे फळ आपण खाऊ द्यायला नको. जर त्याने ते खाल्ले तर तो अमर होईल." म्हणून प्रभूदेवाने त्याला एदेन बागेबाहेर घालवले. त्या वेळेपासून ज्या मातीतून देवाने मनुष्याला घडवले होते त्या मातीत, त्याला स्वत:साठी धान्य पिकविण्यास खूप कष्ट करावे लागले.
उत्पतीची कथा /Bible stories in Marathi
उत्पतीची कथा /Bible stories in Marathi
बायबल कथा marathi