Noah and the Ark bible story/नोहाचे तारू

               Noah and the Ark bible story



                    "मी मानवांना का निर्माण केले ?
                                                (उत्पति 6:5-10)

                         देवाने पाहिले कि लोक त्याच्या इच्छेप्रमाणे वागत नव्हते.ते एकमेकांना दुखवित होते आणि देवाने                           निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट बिघडवीत होते.


Noah and the Ark bible story
story of the bible

Noah and the Ark bible story
Noah and the Ark bible story




        काही काळानंतर सर्व पृथ्वी दुष्ट लोकांनी भरून गेली. त्यांच्या मनात सतत दुष्ट विचार असत. आपण या मानवांना निर्माण केले याचा परमेश्वराला खेद वाटत होता. तो म्हणाला, "मी या दुष्ट लोकांचा तसेच प्राण्यांचा व पक्ष्यांचाही नाश करीन." परंतु नोहा नावाच्या एका माणसाच्या बाबतीत मात्र परमेश्वर समाधानी होता.



Noah and the Ark bible story
Noah and the Ark bible story


       हि गोष्ट आहे नोहाची. त्याला तीन मुले होती शेम, हाम आणि याफेथ. त्या काळात एकटा नोहाच सद्गुणी पुरुष होता. तो देवाचा मित्र होता. देवाला आनंद वाटेल अशा गोष्टी नोहाने केल्या.



            एक तारू तयार कर!  (उत्पति 6:13-22)

             देव नोहाला म्हणाला, "मी या सर्व मानवांचा नाश करणार आहे. त्यांनी हे जग दुष्टाईने भरून टाकले आहे. तुझ्यासाठी एक मोठे तारू तयार कर. त्याच्यासाठी उत्तम लाकूड वापर. मी तार्वाचे सर्व मोजमाफ सांगतो. त्या तारवामध्ये खोल्या कर. त्या तारवाच्या आतून आणि बाहेरून डांबर लाव. मी पृथ्वीवर जलप्रलय पाठवीन. त्यामुळे प्रत्येक जीवाचा नाश होईल. परंतु मी तुला एक वचन देईन. तु आपली पत्नी, आपली मुले आणि सुना यांना घेऊन तारवात जा. तसेच प्रत्येक पशु आणि पक्षी यांची नर व मादी अशी एकेक जोडी घेऊन तारवात जा. तुमच्यासाठी आणि पशु पक्ष्यांसाठी सर्व प्रकारचे अन्नधान्य गोळा करून त्या तारवात साठव." देवाने सांगितल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले.

Noah and the Ark bible story















Noah and the Ark bible story
story of the bible






             तारवात जा!  (उत्पति 7:1-12,19,24 )



Noah and the Ark bible story
Noah and the Ark bible story
अनेक देशांत पुराणकथांतून जलप्रलया विषयी वाचायला मिळते. या गोष्टीत, देवाने दुष्टाईला जलप्रलया द्वारे शिक्षा दिली, पण त्याची आज्ञा पाळणाऱ्यांना त्याने वाचवले, याविषयी सांगितले आहे.

       तारू तयार झाल्यानंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, "तुझ्या सर्व कुटुंबाला घेऊन तु तारवात जा. जगात योग्य ते करणारा असा तु एकटाच आहेस, हे मला माहित आहे. खाण्यास योग्य अशा, प्रत्येक पशूच्या आणि पक्ष्याच्या सात जोड्या तुझ्याबरोबर घे, परंतु इतर प्रकारच्या पशु पक्ष्यांची प्रत्येकी एकच जोडी घे. या प्रकारे प्रत्येक जातीचे पशु आणि पक्षी जिवंत ठेवले जातील. पुढे ते सर्व पृथ्वी व्यापून टाकतील.
                                                         आजपासून सातव्या दिवशी मी सतत 40 दिवस पृथ्वीवर पाऊस पाठवणार आहे. मी निर्माण केलेली सर्व सजीव सृष्टी त्यात नाश पावेल." पुन्हा नोहाने देवाने सांगितल्याप्रमाणे सर्वकाही केले. तो, त्याची पत्नी, मुले, सुना त्या तारवात गेले. देवाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी सर्व पशु आणि पक्षी तारवात नेले. नंतर देवाने तारवाचे दार बंद केले. सात दिवसा नंतर पूर आला.


Noah and the Ark bible story




      







  नोहा 600 वर्षाचा होता तेव्हा हे घडले. सतत 40 दिवस पाऊस पडत राहिला. जमिनीखालचे सर्व पाणी, तसेच आकाशातून कोसळणारे सर्व पाणी यामुळे मोठा प्रलय झाला. नोहाचे तारू पाण्यावर तरंगू लागले.पाणी वरवर चढू लागले.त्याने सर्व पर्वत झाकून टाकले. ते सर्वात उंच पर्वताच्या वर सात मीटर पर्यंत चढले. हे पाणी 150 दिवसांपर्यंत तसेच राहिले.



Noah and the Ark bible story
story of the bible

Noah and the Ark bible story

















         तारवातून बाहेर निघा! (उत्पति 8:1-22)


            तारवात असलेल्या नोहाला आणि सर्व पशु पक्ष्यांना देव विसरला नाही. जमिनीखालून येणारे पाणी थांबले. आकाशातून पडणारे पाणीही थांबले.150 दिवसांत हळूहळू पाणी ओसरू लागले. सरतेशेवटी तारू अरारात पर्वतावर येऊन टेकले. 





पाणी इतके ओसरले कि, पर्वतांचे माथे दिसू लागले. 40 दिवसांनंतर नोहाने एक खिडकी उघडली आणि एक कावळा बाहेर सोडला. तो परत आला नाही. तो सर्व पाणी ओसरेपर्यंत इकडेतिकडे उडत राहिला.नंतर जमीन कोरडी झाली कि नाही ते पाहण्यासाठी नोहाने एक कबुतर सोडले. पण जमीन अजूनही पाण्याने व्यापलेली होती.कबुतराला पाय टेकायला जागा मिळाली नाही. ते तारवाकडे परतले व नोहाने त्याला तारवात घेतले. एका आठवड्याने नोहाने कबुतराला परत बाहेर पाठवले. ते त्याच संध्याकाळी चोचीत झाडाचे एक ताजे पान घेऊन परतले. त्यावरून पाणी ओसरले आहे हे नोहाला समजले. दुसऱ्या आठवड्यानंतर नोहाने कबुतराला पुन्हा तारवाबाहेर पाठवले.यावेळी मात्र ते परतले नाही.
















    नोहाने तारवावरील झाकण काढले आणि पाहिले तर जमीन हळूहळू कोरडी होत आहे हे त्याच्या लक्षात आले. शेवटी ती पूर्णपणे कोरडी झाली. त्यावेळी 601 वर्षाचा होता.

         देव नोहाला म्हणाला, "आपल्या कुटुंबासह तारवाबाहेर ये. तुमच्याबरोबर सर्व पशुपक्ष्यांनाही  बाहेर काढ. त्यांना पुष्कळ पिले होऊ दे. ती सगळीकडे पांगू दे."  तेव्हा नोहा आपल्या कुटुंबातील लोकांसह तारवाबाहेर आला. सर्व पशुपक्षी आपापल्या जातवारी प्रमाणे गटागटाने बाहेर पडले. नोहाने परमेश्वरासाठी एक वेदी बांधली.त्याने निवडक पशुपक्ष्यांपैकी प्रत्येक जातीचे पशुपक्षी घेतले. परमेश्वराला अर्पण म्हणून त्याने त्या पशुपक्ष्यांचे त्या वेदीवर होमार्पण केले.यामुळे परमेश्वराला समाधान वाटले.परमेश्वर मनात म्हणाला, "प्रत्येकजण बालपणापासून दुष्टाई करतो.परंतु पुन्हा कधीही मी पृथ्वीवरील सर्व जीवनाचा नाश करणार नाही.पृथ्वीवर नेहमी पेरणी व कापणी होईल. सर्वदा थंडी आणि ऊन, उन्हाळा व हिवाळा,रात्र व दिवस हि होत राहतील."




      माझ्या अभिवचनाचे चिन्ह पाहा!
          (उत्पति 9:8-15 )


"करार या शब्दाचा अर्थ देव आणि त्याचे लोक यांच्यामधील फार महत्वाचा समझोता. करार करताना वचन दिल्याची आठवण म्हणून प्रत्येकाला काहीतरी देण्यात येते. येथे या कराराची आठवण राहावी म्हणून दिलेले चिन्ह फार विशेष प्रकारचे होते. ते आज या काळातही आपण पाहू शकतो.


Noah and the Ark bible story








देव नोहाला आणि त्याच्या मुलांना म्हणाला, "मी तुझ्याबरोबर  आणि तुझ्या मुलांबरोबर करार करीत आहे. तुमच्या नंतरच्या लोकांसाठी हा करार असाच राहील. हा करार तुझ्याबरोबर तारवातून बाहेर पडलेल्या सर्व पशुपक्ष्यांसाठीही आहे. मी असे वचन देतो कि, पृथ्वीचा नाश यापुढे कधीही जलप्रलयाने होणार नाही. मी ढगांमध्ये माझे मेघधनुष्य ठेवीन. ते माझ्या वचनाचे चिन्ह म्हणून राहील. हे तुझ्यासाठी आणि सर्व सजीव प्रांण्यासाठी आहे. आकाशात मेघधनुष्य दिसेल, तेव्हा माझ्या कराराची मला आठवण येईल. यापुढे मी कधीही जलप्रलयाने पृथ्वीवरील सर्व जीवितांचा नाश करणार नाही." 

     

Noah and the Ark bible story 
story of the bible










 
                                

       
Previous Post
Next Post
Related Posts