How to belive in god with all your heart- देवावर मनापासून विश्वास कसा ठेवावा


How  to belive in god with all your heart
 देवावर मनापासून विश्वास कसा ठेवावा  



Faith with wisdom

 सुज्ञतेसह आस्था 


 पवित्र शास्त्रामध्ये  आपल्याला महान कामिगिरी, सर्व राष्ट्रांना जाऊन सुवार्तेची घोषणा करण्याची जबाबदारी (मत्तय 28:11-20 ) आणि महान आज्ञा  देव व शेजारी यांच्यावर प्रीती करणे (लूक 10:27) ह्या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सुवार्तेमधील सत्य प्रीतीने सांगणे अगत्याचे आहे. म्हणूनच प्रितीविना सत्य हे विध्यंसक असते तर सत्याशिवाय प्रीती हा खोटेपणा असतो. यासाठीच पवित्र शास्त्र नमूद करते कि येशू अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.(योहान1:14)


आपण राहतो ते जग दु:खाने भरलेले आहे. अशा जगाला येशू ख्रिस्ताच्या तारणदायी सामर्थ्याची ओळख होणे अगत्याचे आहे. त्याकरिता त्यांना सुवार्तेचे सत्य समजणे व त्याचा अनुभव येणे आवश्यक आहे. येशूने स्वत:च  म्हटले आहे, "तुम्हांला सत्य समजेल  व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील" (योहान 8:32). पण देवाचे वचन आपल्याला असेही सांगते कि प्रीतीने सत्य सांगितले पाहिजे. पवित्र शास्त्रात दाखवले आहे त्याप्रमाणे आपण आस्था आणि सुज्ञता ह्या गोष्टींचा अभ्यास करू या ..



How  to belive in god with all your heart
 देवावर मनापासून विश्वास कसा ठेवावा  

Faith with wisdom



How  to belive in god with all your heart  देवावर मनापासून विश्वास कसा ठेवावा




आस्था 

आस्था म्हणजे ध्येय उद्देशाप्रत पोहोचण्यासाठी पराकाष्ठेने आणि मनापासून प्रयत्न करणे होय. जुन्या करारामध्ये देवाविषयी वाटणारा आवेश खास आस्था, उत्साहाने सेवेसाठी पुढे जाणे पाहायला मिळते. यावर प्रत्यक्ष देवाच्या इच्छेने, नियमशास्त्राचे नियंत्रण आहे याचे वर्णन स्तोत्र 69:9 ह्या वचनात वाचायला मिळते. "कारण तुझ्या मंदिरा विषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकिले आहे." निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझी निंदा झाली आहे. आस्था, आवेश स्वार्थी उद्देशांसाठी वापरला तर त्यामुळे सह्भागीतेचे नुकसान होते व सम्पुष्टात  येते आणि म्हणूनच ते नकारात्मक रीतीने वापरले आहे. मत्सर, हेवा हि आस्था आवेशाची विकृती आहे. (नीति 6:24) मध्ये आस्था हा शब्द मानवी जगतात भाव भावनांसाठी  वापरला आहे, "कारण ईर्ष्या  पुरुषास  संतप्त करिते, सूड उगवण्याच्या दिवशी तो गय करणार नाही."

            नव्या करारामध्ये दोन्ही, चांगल्या अर्थाने व वाईट अर्थाने म्हणजे हेवा-मत्सर  आस्थेविषयी पाहायला मिळते. हेवा-मत्सर आणि भांडण-तंटा ह्या गोष्टी मंडळीच्या अस्तीत्वासाठी अत्यंत घातक आहे. ( याकोब 3:16 ; पडताळून पाहा  वचन 14 ; 1 करिंथ 3:3; 2 करिंथ 12:20 )    ख्रिस्ती व्यक्तीने हेवा-मत्सर दाखवू नये तर आत्माने चालावे (गलती 5:14,20 ) आणि प्रीतीने वागावे (रोम 13:13).



देवाची आस्था 

            देवाचा आवेश, आस्था याविषयी सांगणारे परिच्छेद आहेत, त्यामुळे देव लोकांशी क्ष प्रकारे नेटाने , तडजोड न करता सहभागी होऊन व्यवहार करतो यावर भर दिलेला आहे. निर्गम 20:5 मध्ये देव स्वत:ला ईर्ष्यावान म्हणतो, आपण वाचतो, "कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करितात त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करितो. "देवाचा आवेश कशा प्रकारे दुहेरी कार्य करतो ते येथे नमूद केले आहे.



How  to belive in god with all your heart
 देवावर मनापासून विश्वास कसा ठेवावा  

Faith with wisdom



How  to belive in god with all your heart  देवावर मनापासून विश्वास कसा ठेवावा



          देव  वाईट करणाऱ्यांना  शासन करण्यासाठी आवेशाचा वापर करतो. आणि येथे आस्था-आवेश म्हणजे देवाचा क्रोध असे आपण गणना 25:11 मध्ये वाचतो, " परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्त्राएल लोकांपैकी अहरोन याजकाचा  नातू, एलाजाराचा मुलगा फिनहास ह्याने त्यांच्यामध्ये माझ्या  ईर्ष्येने पेटून इस्त्राएल लोकांवरील माझा संताप दूर केला म्हणून मी  आपल्या ईर्ष्येने त्यांचा संहार केला नाही." देवाचा आवेश-आस्था त्याच्या नीतिमान न्यायनिवाड्यातून व्यक्त झालेला आहे.


        दुसऱ्या बाजूला, देवाने भय बाळगणाऱ्यांसाठी आस्था हि प्रत्यक्षात कृपा आहे. आपण यशया 63:15 ह्या वचनात आपण वाचतो, "तु स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पाहा, तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे."


ख्रिस्ती लोक ह्या नात्याने आपण आधीच आपले प्राधान्य कर्म ठरवलेले आहेत. आम्हाला प्रभुसाठी आवेशी असावे म्हणून पाचारण केलेले आहे. देवाला ज्या गोष्टी विषयी आस्था आहे त्यासाठी आवेशी असण्याकरिता आम्ही फिनहास प्रमाणे त्याच्या मान सन्मानासाठी  आवेशी असले पाहिजे तसेच देवावर प्रीती करणाऱ्या व त्याचे भय बाळगणाऱ्यांबद्दल  आम्हांला वाटणारी करुणा  व दया याबाबतीत आम्ही आवेशी असणे आवश्यक आहे.


         भीतीदायक परिस्थिती आमच्यासमोर आल्यावर कदाचित देवाच्या कार्याबद्दल आमचा आवेश, आमची आस्था  मावळून जाईल. एलिया संदेष्ट्याच्या  बाबतीत असेच घडले.

                  1 राजे 19:10  ह्या वचनात आपल्याला एलियाच्या आवेश विषयी वाचायला मिळते,  "तेव्हा पाहा, परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले. तो त्यास म्हणाला, "एलिया तु येथे कशासाठी आलास? तो म्हणाला, सेनाधीश  देव परमेश्वर याचविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्त्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडिले तुझ्या  वेद्या मोडून टाकिल्या. तुझे  संदेष्टे तरवारीने वधिले, मीच काय तो एकटा उरलो आहे आणि ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत."

        1 राजे 17-18 ह्या अध्यायात  एलिया संदेष्ट्याचे  वर्णन शक्ती व सामर्थ्य ह्यांनी युक्त असे आहे. परंतु अध्याय 19 मध्ये मात्र दुर्बल व परित्याग करणारा असे आहे. एलीयाने कोणत्याही शत्रूचा मुलाहिजा ठेवला नव्हता, मग तो शत्रू बलाढ्य अहाब असो वा बआलाचे साडेचारशे संदेष्टे  व  धर्मभ्रष्ट  इस्त्राएल लोक असोत किवा मरणासन्न मुलाची अंध श्रद्धाळू  आई असो. एलीयाने जादूटोणा करून नाही, तर प्रार्थनाद्वारे  नेहमीच अद्भुत  चमत्कार केले. त्याने सारफथ  येथील उपासमारीने त्रासलेल्या विधवेला अन्न दिले, दुष्काळ संपविण्यासाठी  पाऊस पाडला. होमार्पणासाठी  अग्नी आणला आणि दयेची  खात्री पटवत आजारी मुलाला जीवनदान देऊन आरोग्य दिले. 1 राजे 19:1-18 मध्ये त्याचे चित्र अगदीच निराळे आहे. येथे बलवान असा तो दुर्बल आहे. तो त्याची नवी शत्रू ईजबेल हिच्यासमोर थरथर कापतो. आणखी एक अद्भुत चमत्कार महान कार्य करणे दूरच तो आपल्या जीवाच्या भीतीने रानात पळून गेला.

             

             आपल्या दुहेरी तक्रारीत वचन 10,14 मध्ये तो म्हणतो, त्याचे शत्रू त्याचा जीव घेऊ पाहत आहेत, या ठिकाणी आपल्याला एलिया दुबळा आणि निराश असा दिसतो, याचे कारण त्याने अचानकपणे स्वत:ला  इस्त्राएलाच्या देवापासून वेगळे केले. हा इस्त्राएलाचा देव आकाश व पृथ्वीचा देव आहे, त्याच्यापासूनच त्याला सामर्थ्य मिळत असे. त्याच्यापासूनच तो बाजूला गेला. "सेनाधीश देव परमेश्वर याज विषयी मी फार ईर्ष्यायुक्त  झालो आहे. त्याचा स्वत:चा भविष्य संदेश सांगण्याचा अधिकार व अस्सलपणा हि सकारात्मक  बाब त्याने लक्षात आणावयास हवी होती .

समजा, तुमच्या सेवाकार्यात वाईट गोष्टी घडत असल्याचे तुम्हांला दिसत आहे. परिणामी ते सोडून देण्याची आणि कदाचित शरणागती पत्करण्याची तुमची तयारी असेल तर खात्रीने तुमचे सामर्थ्य कोठून येते याचा तुम्हांला विसर पडला आहे. माझ्याशिवाय तुम्हांला काहीही करिता येणार नाही  असे म्हणणाऱ्या प्रभु परमेश्वराकडूनच आम्हांला सामर्थ्य मिळत असते हे आम्ही कायम लक्षात ठेवणे अगत्याचे आहे. प्रभूच्या मार्गाने वाटचाल करण्यातच शहाणपण, सुज्ञता आहे. 



देवाची सुज्ञता :-

     प्रभूचे भय हे सुज्ञतेच्या  शिक्षणातील मुख्य तत्व आहे. "परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय" (नीती 1:7) सुज्ञता  म्हणजे लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देवाने केलेल्या करारानुसार त्याच्या जीवनातून हे सुज्ञता मिळते आणि म्हणूनच त्याकडे देवाचे कृपादान म्हणून पहिले पाहिजे.

          लूक 2:40,52  ह्या वचनात आपण वाचतो कि येशू ज्ञानाने पूर्ण होत गेला. तसेच नियम शास्त्राचे  त्याचे ज्ञान अनन्य साधारण असल्यामुळे त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याचे ज्ञान पाहून लोक आश्चर्य चकित झाले आणि सुताराच्या मुलाची सुज्ञता पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केली .(मार्क 6:2 पडताळून पाहा, मत्तय 13:54)

                 प्रेषितांची कृत्येमध्ये  आपल्याला  स्तेफन देवाने  आत्माने व ज्ञानाने सुसज्ज  केलेला माणूस असा दिसतो. त्याच्या साक्षीचा  प्रतिवाद लोकांना करिता आला नाही, कारण देवाने त्याला ज्ञान व आत्माने परिपूर्ण केले होते (प्रे.कृत्ये 6:3,10). आम्हांलाही असेच ज्ञान देण्याचे  अभिवचन येशूने  दिले आहे. ह्या ज्ञानाचे कोणालाही खंडन करिता येणार नाही  वा त्यासमोर टिकाव लागणार नाही. छळ होईल तेव्हा मदत करण्याचे अभिवचन दिले आहे. तसेच समर्थन करणारे भाषण करण्याकरिता ज्ञान देण्याचे अभिवचन दिले आहे  (लूक 21:15).



How  to belive in god with all your heart
 देवावर मनापासून विश्वास कसा ठेवावा  



How  to belive in god with all your heart  देवावर मनापासून विश्वास कसा ठेवावा



   सुज्ञता म्हणजे ज्ञानाचा संचयच  असणे नाही ,तर देवासमोर उभे  राहण्याचे ते एक साधन आहे. त्याचप्रमाणे मूर्खपणा म्हणजे ज्ञानाचा अभाव नाही  तर देवासमोर उभे राहण्याच्या  ह्या साधनाचा अभाव असणे होय.





Previous Post
Next Post
Related Posts