The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात

 

The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात

आतापर्यंत आपण वाचलेल्या सर्व गोष्टी मेसोपोटेमिया या देशात घडून आल्या. आज हा इराक देशाचा एक भाग आहे.
या प्रकरणातील गोष्टी अब्राम आणि त्याच्या कुटुंबाविषयी आहेत. देव कसा आहे आणि लोकांनी कसे वागावे याविषयी देवाची इच्छा काय होती, हे जाणून घ्यायला लोक कसे शिकले ते आता आपण वाचणार आहोत.


                 देव अब्रामाची निवड करतो  (उत्पति 12:1-7 )

The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
मेसोपोटेमिया देशातील लोक, तसेच इतर देशांतील लोक अनेक देवांवर विश्वास ठेवीत. ते सुर्य, चंद्र, तारे यांची उपासना करीत. अब्राम मात्र वेगळा होता. तो ज्याने सुर्य,चंद्र,आणि तारे निर्माण केले होते त्या एकाच खऱ्या देवावर किंवा "प्रभूवर" विश्वास ठेवीत असे.देवाने अब्रामाला आपले घर आणि आपले लोक सोडून एका दूरवरच्या देशात जाण्यास सांगितले. देवाने तो नवीन देश अब्राम  आणि त्याच्या संतानाला देण्याचे वचन दिले.


 Abraham And Isaac Bible Story

 the story bible


परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, "मी तुला दुसऱ्या देशात घेऊन जातो. तु आपला देश आणि घरदार सोडायला पाहिजे. मी तुला अनेक मुलेबाळे, नातवंडे देईन. तुझ्या कुटुंबाचे एक दिवस मोठे राष्ट्र बनेल. मी तुला सुखीसमाधानी करीन. तुझे नाव सगळीकडे घेतले जाईल. तु अनेकांचे जीवन सुखी करशील.
             जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी सुखीसमाधानी करीन. परंतु जे तुझे वाईट करतील त्यांचे मी वाईट करीन. तुझ्याद्वारे मी अनेक राष्ट्रांना आशीर्वाद करीन."
          हारान देश सोडला, तेव्हा अब्राम 75 वर्षाचा होता.त्याची पत्नी साराय आणि पुतण्या लोट दोघेही त्याच्याबरोबर निघाले. अब्राम श्रीमंत मनुष्य होता. त्याच्याजवळ अनेक गुलाम आणि जनावरे होती. त्याने आपली सर्व संपत्ती आपल्याबरोबर घेतली आणि तो कनान देशात आला.
            अनेक मैल प्रवास करून तो श्खेम या ठिकाणी आला. तेथे एक पवित्र वृक्ष होता. त्या ठिकाणी लोक त्यांच्या दैवताची उपासना करीत.अब्रामाला परमेश्वर दर्शन देऊन म्हणाला, " एके दिवशी हि भूमी मी तुझ्या लोकांना देईन." मग अब्रामाने तेथे एक वेदी बांधली आणि परमेश्वराला अर्पणे वाहिली .
         कनान देशाला नंतर इस्त्राएल हे नाव पडले. देवाने अब्रामाचे नाव बदलून अब्राहाम  म्हणजे "अनेक राष्ट्रांचा पिता" असे ठेवले. सारायचे नाव बदलून सारा  असे ठेवण्यात आले. साराचा अर्थ "राजकन्या"असा आहे. यानंतर अनेक वर्षांनी अब्राहाम आणि सारा खूपच  वृध्द झाले.तेव्हा देवाने त्यांना इसहाक नावाचा पुत्र दिला.

           देव अब्राहामाची तयारी करतो  (उत्पति 22:1-18)

 अब्राहामाच्या मेसोपोटेमिया देशात एक विचित्र रूढी होती. लोक काही वेळा त्यांच्या दैवतांना आपल्या मुलांचे बळी देत. मुलांची देणगी दिल्याबद्दल देवदैतांची उपकारस्तुती करण्याची हि पद्धत आहे, असा त्यांचा समज होता. त्यामुळे देवदैवते आपल्याला भरपूर मुलेबाळे देतील, असे त्यांना वाटत होते.

The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
           

  देवाला अब्राहामाची परीक्षा घ्यायची होती.देवाने त्याला बोलावून म्हटले."तु तुझा एकुलता एक पुत्र इसहाक याच्यावर खूप प्रेम करतोस, हे मला माहित आहे. आता त्याला मोरिया देशात घेऊन जा. तेथे मी तुला एक डोंगर दाखवीन. त्या डोंगरावर एक वेदी बांध आणि तेथे इसहाकाचे माझ्यासाठी अर्पण कर."
Abraham And Isaac Bible Story
the story bible


The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
           दुसरे दिवशी सकाळीच अब्राहाम इसहाकाला घेऊन मोरिया देशाकडे निघाला. त्याने आपल्याबरोबर दोन दास आणि जळण्याची लाकडे वाहून नेण्यासाठी एक गाढव घेतले.तिसऱ्या दिवशी दूरवर असलेला तो डोंगर अब्राहामाच्या दृष्टीत पडला. तेव्हा तो त्या दासांना म्हणाला, "तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा. मुलाला घेऊन मी देवाची उपासना करण्यासाठी तिकडे जातो आणि पुन्हा माघारी येतो."
The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
          Abraham And Isaac Bible Story
         the story bible









              अब्राहामाने जाळणाची लाकडे इसहाकाच्या पाठीवर ठेवली.तसेच त्याने एक सुरा आणि जळते निखारे आपल्याबरोबर घेतले होते. रस्त्याने जातांना इसाहाकाने वडिलांना विचारले, "बाबा, आपल्याजवळ अग्नी आहे, लाकडे आहेत, परंतु अर्पणासाठी मेंढरू कोठे आहे?" 
                अब्राहामाने उत्तर दिले, "देवच आपल्यासाठी मेंढरू देईल, माझ्या बाळा!"
The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात





The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात


 Abraham And Isaac Bible Story
         the story bible


   शेवटी ते डोंगराजवळ पोहोचले. तेथे डोंगरमाथ्यावर अब्राहामाने वेदी बांधली आणि तिच्यावर लाकडे रचली. त्याने आपल्या मुलाला बांधून लाकडांवर ठेवले. नंतर त्याने इसाहाकाला मारण्यासाठी त्याचा सुरा उचलला, परंतु त्याच क्षणी स्वर्गातून प्रभूच्या दूताने हाक मारली, "अब्राहामा, मुलाला मारू नको! आता मला समजले कि तु आज्ञापालन करून देवाचा आदर करतोस. कारण तु आपल्या एकुलत्या एक मुलाचेही अर्पण देण्यास तयार झालास."

The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
         
 Abraham And Isaac Bible Story
         the story bible













               मग अब्राहामाने मागे वळून पाहिले तर एक मेंढा एका झुडपात शिंगे अडकून पडलेला त्याला दिसला. त्याने इसाहाकाचे हातपाय सोडले व मेंढ्याला घेऊन त्या वेदीवर त्याचे अर्पण केले. हे प्रभूला केलेले होमार्पण होते. अब्राहामाने त्या जागेचे नाव "याव्हे यीरे म्हणजे प्रभु पाहून देईल" असे ठेवले.

The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
    Abraham And Isaac Bible Story
         the story bible

 








The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात


               प्रभूच्या दूताने स्वर्गातून पुन्हा अब्राहामाला हाक मारली. प्रभु म्हणाला, "तु आपल्या एकुलत्या एक मुलाचे माझ्यासाठी अर्पण देण्यास तयार झालास म्हणून मी तुला भरपूर आशीर्वाद देईन. तु अनेकांचा खापरपणजोबा होशील. तुझे लोक त्यांच्या शत्रूंना पकडतील. मी तुझ्या लोकांना आशीर्वाद दिला त्याप्रमाणेच इतर लोकही सगळीकडे आशीर्वादित होतील.कारण तु माझे आज्ञापालन केले आहेस."


                                                                
 

 
        
 Abraham And Isaac Bible Story
         the story bible



Previous Post
Next Post
Related Posts